म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बोटेझरी भागात गजराज नावाचा हत्ती अचानक आक्रमक झाल्याने त्याने प्रकल्पाच्या दोन अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यात मुख्य लेखापाल ठार झाले, तर सहायक वनसंरक्षक रवींद्र कुलकर्णी जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. सहायक वनसंरक्षक रवींद्र कुलकर्णी आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य प्रमोद लेखापाल गौरकार त्याच भागात गस्तीसाठी फिरत होते. त्यांचे वाहन चिखलात अडकले होते. यावेळी हत्तीने दोघांवर हल्ला केला. यात प्रमोद गौरकर यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर ताबडतोब घटनास्थळी 'रॅपिड रिस्पॉन्स टीम', पशुवैद्यकीय पथक आणि ताडोबाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हत्तीला पकडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ऑपरेशन सुरू होते. दरम्यान, कोअर भागातील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक आणि क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.
https://ift.tt/3nTRDGR