नवी दिल्ली : शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गुरुवारी (१४ मे २०२१) ३ लाख २६ हजार ०९८ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ५३ हजार २९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अर्थात नवीन दाखल झालेल्या रुग्णसंख्येपेक्षा गुरुवारी करोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसली. कालच्या एका दिवसात ३८९० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ४३ लाख ७२ हजार ९०७ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ६६ हजार २०७ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत २ कोटी ०४ लाख ३२ हजार ८९८ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३६ लाख ७३ हजार ८०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ४३ लाख ७२ हजार ९०७
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ०४ लाख ३२ हजार ८९८
- उपचार सुरू : ३६ लाख ७३ हजार ८०२
- एकूण मृत्यू : २ लाख ६६ हजार २०७
- करोना लसीचे डोस दिले गेले : १८ कोटी ०४ लाख ५७ हजार ५७९