भरूचच्या पटेल रुग्णालयात आग, १८ कोविड रुग्णांचा होरपळून मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 1, 2021

भरूचच्या पटेल रुग्णालयात आग, १८ कोविड रुग्णांचा होरपळून मृत्यू

https://ift.tt/3ufg0RS
: राज्यातील भरूचमध्ये शुक्रवारी-शनिवारच्या रात्री एका कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत १८ रुग्णांचा झाला आहे. या घटनेचे काही विलचित करणारे दृश्यं समोर आले आहेत. आगीनंतर काही रुग्णांचे भाजलेल्या अवस्थेतील अवशेष बेड आणि स्ट्रेचर पाहायला मिळाले. तर काही श्वास गुदमरल्यामुळे झाला होता. रात्री १.०० वाजल्याच्या सुमारास भरुचच्या ''च्या कोविड वॉर्डमध्ये अचानक आग लागली होती. अद्याप आगीच नेमकं कारण मात्र समजू शकलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. 'भरुचमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीमुळे शोकाकूळ आहे. माझी सहानुभूती पीडित कुटुंबांसोबत आहे' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. हे रुग्णालय भरूच - जमशेदपूर महामार्गावर राजधानी अहमदाबादपासून जवळपास १९० किलोमीटर अंतरावर आहे. 'पटेल वेल्फेअर' ही चार मजल्यांची इमारत आहे. इथे जवळपास ५० रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्यानंतर काही रुग्णांना स्थानिक आणि अग्निशमनदलाच्या मदतीमुळे सुखरुप बाहेर पडता आलं. परंतु, १८ रुग्ण मात्र दुर्दैवी ठरले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ६.३० वाजेपर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १८ पर्यंत पोहचली. आगीनंतर लगेचच १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं आम्हाला समजलं होतं. आगीच्या घटना आणि रुग्णांचे मृत्यू - गुजरातच्या भरूचपूर्वी २६ एप्रिल रोजी सूरतमध्ये एका रुग्णालयात लागलेल्या आगीत ४ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. - २८ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील ठाण्याच्या प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयात लागलेल्या आगीत ४ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता - १७ एप्रिल रोजी छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या एका खासगी रुग्णालयात आग लागल्यानंतर पाच करोना संक्रमित रुग्णांनी आपले प्राण गमावले होते.