अझरने शेअर केला खास फोटो; क्रिकेट इतिहासात आज देखील हा विक्रम कायम आहे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 23, 2021

अझरने शेअर केला खास फोटो; क्रिकेट इतिहासात आज देखील हा विक्रम कायम आहे

https://ift.tt/349YRxi
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनने शनिवार सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला. ज्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. अझरने ट्विटरवर एका बॅटचा फोटो शेअर केला. ज्या बॅटने त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता जो आज देखील त्याच्या नावावर आहे. सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष असलेल्या अझरूद्दीने १९८५ साली पदार्पणाच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यात सलग तीन शतक झळकावली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू होता आणि आतापर्यंत कोणालाही हा विक्रम मोडता आला नाही. अझरने सोशल मीडियावर बॅटचा फोटो शेअर केला. कोलाज स्वरुपात शेअर केलेल्या या फोटोत अझर भारतीय संघाच्या रेट्ऱो जर्सीमध्ये दिसतोय. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला अझर म्हणतो, या बॅटने मी इंग्लंडविरुद्ध ८४-८५ साली पदार्पणाच्या तीन कसोटीत तीन शतक केली होती. त्या हंगामात मी या बॅटने ८०० धावा केल्या होत्या. ही बॅट माझ्या आजोबांनी निवडली होती. कोलाजमधील पहिल्या फोटोत अझरने रेट्रो जर्सी घातली आहे. ज्यात तो बॅटीकडे पाहतोय. ही बॅट त्याच्यासाठी खास आहे कारण, अझरने १९८४ साली इंग्लंडविरुद्ध कोलकातामध्ये कसोटीत पदार्पण केले होते. पहिल्या डावात अझरने ३२२ चेंडूत ११० धावा केल्या. ही कसोटी ड्रॉ झाली. दुसरी कसोटी चेन्नीत झाली होती. तेव्हा अझरने दुसऱ्या डावात १०५ धावा केल्या. तर पहिल्या डावात ४८ धावा केल्या होत्या. तिसरी कसोटी कानपूरमध्ये झाली. तेव्हा अझरने २७० चेंडूत १२२ धावा करत वर्ल्ड रेकॉर्ड केला. अखेरच्या कसोटीत अझरने ४३ चेंडूत ५४ धावा केल्या होत्या. अझरने भारतकडून ९९ कसोटीत ४५.०३च्या सरासरीने ६ हजार २१५ धावा केल्या. ज्यात २२ शतक आणि २१ अर्धशतक होती. तर ३३४ वनडेत अझरने ७ शतक आणि ५८ अर्धशतकांसह ९ हजार ३७८ धावा केल्या.