'फेक' कोविड लसीकरण केंद्र कसं ओळखाल? जाणून घ्या... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 25, 2021

'फेक' कोविड लसीकरण केंद्र कसं ओळखाल? जाणून घ्या...

https://ift.tt/3xPbaMm
नवी दिल्ली : देशभर करोना संक्रमणाविरोधात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असताना काही ठिकाणी 'बनावट' लसीकरण केंद्रांचा काळाबाजार समोर आला आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात मुंबईत '' प्रकरण उघड झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनीही खोट्या लसीकरण केंद्राविषयी तक्रार नोंदवली आहे. लस उपलब्ध झाल्यामुळे सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयाशिवाय अनेक नेत्यांकडून आणि संस्थांकडूनही लसीकरण केंद्रांची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी ही चांगलीच बाब म्हणावी लागलेत. परंतु, लसीकरणाला जाण्यापूर्वी आपण लस घेण्यासाठी जात असलेलं केंद्र 'बनावट' तर नाही ना... याची खात्री नागरिकांनी अवश्य करून घ्यावी. लसीकरण केंद्रासाठी आवश्यक गोष्टी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही ''च्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार... कुणालाही लसीकरण केंद्र सुरु करायचं असेल तर ते स्थानिक प्रशासनाच्या किंवा खासगी रुग्णालयाच्या मदतीनं सुरू करता येतं. याचं कारण म्हणजे, ठराविक ठिकाणीच लस उपलब्ध होत आहे. देशात लस सरसकट उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. केंद्र सरकारकडून लस खरेदी करून राज्यांना डोस उपलब्ध करून दिले जात आहेत. तर खासगी रुग्णालयांना थेट लस निर्मात्यांकडून लस खरेदीची परवानगी देण्यात आलेली आहे. एखादी संख्या खासगी रुग्णालयासोबत लसीकरण कॅम्प लावत असेल तर इथे लस खासगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करून दिलं जातं तसंच लस देणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारीही याच रुग्णालयाशी संबंधित असतात. जिथे लसीकरण केंद्र उभारलं जाणार आहे तिथे योग्य जागा, लस ठेवण्यासाठी आहे किंवा नाही याची खातरजमा आरोग्य विभागाकडून केली जाते. त्यामुळे, तुम्ही लस घेण्यासाठी ज्या केंद्रावर जात असाल तिथे अगोदर चौकशी करून हे केंद्र सरकारद्वारे किंवा कोणत्या खासगी रुग्णालयाद्वारे सुरू करण्यात आलंय, याची माहिती जरूर घ्या. तज्ज्ञांच्या केंद्राला सूचना आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केंद्रानं यासंबंधी जारी करणं गरजेचं आहे. त्यामुळे नागरिक अशा धोकादायक जाळ्यात अडकणार नाहीत. कॅम्प लावण्यासोबतच एका फलकावर केंद्राची परवानगी आणि व्यवस्थेविषयी सगळी माहिती देण्याचे आदेश सरकारकडून देण्यात यावेत. तसंच लोकल इम्युनायजेशन अधिकाऱ्यांचाही क्रमांक शेअर केला जावा. त्यामुळे लोकांना काही शंका असल्यास ते थेट फोन करून माहिती घेऊ शकतील, अशी मागणी आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येतेय. लसीकरण केंद्र आवश्यक त्या परवानग्यांसहीत आणि सुविधांसहीत चालवला जात आहे किंवा नाही, हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांनाही देण्यात यावी, अशी सूचनाही आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात आलीय.