महापौर निवडणूक: शिवसेनेच्या दोन गटांत राडा; संपर्कप्रमुखालाही धक्काबुक्की - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 30, 2021

महापौर निवडणूक: शिवसेनेच्या दोन गटांत राडा; संपर्कप्रमुखालाही धक्काबुक्की

https://ift.tt/3h3HCF6
अहमदनगर: पालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या उमेदवाराच्या बिनविरोध निवडीची घोषणा आज होणाऱ्या निवड सभेत होणार आहे. त्यापूर्वीच मध्यरात्री शिवसेनेच्या दोन गटांत राडा झाला. या निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेवाराच्या पतीला मारहाण झाल्याची तक्रार आहे. अन्य नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. महापौर निवडीसाठी आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणातून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला. (Scuffle between two groups of Shivsena In ) या निवडणुकीत शिवसेनेतर्फे दोन महिला उमेवार इच्छुक होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी यातील शीला भाकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे रोहिणी शेंडगे यांचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी अर्जही दाखल केला असून त्यांच्या निवडीच्या घोषणेची आता फक्त औपचारिकताच बाकी आहे. वाचा: या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांत मारामारी झाली. माघार घेतले उमेदवार भाकरे यांच्या पतीला मारहाण करण्यात आली. नगरसेवक अनिल शिंदे आणि भाकरे या दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्यातून पुढे मोठा राडा झाल्याचे सांगण्यात आले. माजी शहर प्रमुख संभाजी कदम, अनिल शिंदे यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात येते. एवढेच नव्हे तर निवडणुकीसाठी आलेले संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनाही जमावाकडून धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात आले. भाकरे यांनी आपल्याला कदम आणि त्यांच्या माणसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, माझ्या पत्नीने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापौर निवडणुकीतून माघार घेतले होती. माझ्यावर पैसे मागितल्याचा आरोप करून कदम व शिंदे यांच्या लोकांना मारहाण केली. जातीवाचक शिव्या दिल्या. गळ्यातील सोन्याची साखळी काढून नेली. आपल्याला काल दिवसभर दारू पाजण्यात आली. त्यानंतर रात्री मारहाण झाली, अशी तक्रार भाकरे यांनी केली आहे. वाचा: आज दुपारी महापौर निवडीसाठी ऑनलाइन सभा होणार आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या महापौराच्या बिनविरोध निवडीची औपाचारिक घोषणाच बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकत्र आल्याने शिवसेनेला महापौरपद मिळत आहे. असे असताना शिवसेनेच्या दोन गटांतील वाद उफाळून आल्याचे पहायला मिळाले. वाचा: