
गुवाहाटीः राज्यातील अल्पसंख्यांकांच्या वाढत्या लोकसंख्येची गती कमी करण्या सरकार विशेष धोरणात्मक पावलं उचलेलं. याचा उद्देश हा गरीबी आणि निरीक्षरता निर्मूलन असेल. राज्य सरकारचे प्राथमिक लक्ष्य आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्राला चालना देण्याचा आहे. याद्वारे उचलण्यात येणाऱ्या पावलाद्वारे मुस्लिमांची वाढती लोकसंख्या रोखली जाईल, असं मुख्यमंत्री हिमंत सरमा ( ) म्हणाले. खरंतर अशा प्रकारची भावना ही समाजातूनच आली पाहिजे. कारण सरकार याबाबत काही प्रक्रिया सुरू केल्यास त्याचा राजकीय अर्थ काढला जाईल. हा राजकीय मुद्दा नाही. तर सर्व माता आणि भगीनींच्या भल्यासाठी आणि त्याहूनही अधिक म्हणजे हे समाजाच्या भल्यासाठी आहे, असं सरमा ( ) यांनी सांगितलं. 'हिंदूंची लोकसंख्या १० तर मुस्लिमांची २९ टक्क्यांनी वाढतेय' आसाम आपली वार्षिक लोसकंख्या वाढ ही १.६ टक्के ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. पण आकडेवारी पाहता मुस्लिमांची लोकसंख्या २९ टक्क्यांनी आणि हिंदूंची लोकसंख्या ही १० टक्के वेगाने वाढते आहे. आपण मुस्लिम समाजाच्या नेत्यांशी सतत संपर्कात आहोत. मुस्लिम समाजात नेतृत्व उभारण्यासाठी पुढच्या महिन्यात अनेक संघटनांशी चर्चा करणार आहोत, असं सरमा म्हणाले. 'लोकसंख्या नियमांचे पालन करणाऱ्यांना मिळेल लाभ' आपले सरकार दोन मुलांसह लोकसंख्या धोरण राबवण्यासाठी योजना तयार करत आहे. याचे पालन करणाऱ्या कुटुंबांना खास योजनेद्वारे लाभ मिळेल. अशा प्रकराचा एक नियम पंचायत निवडणूक आणि राज्य सरकारच्या नोकऱ्यांसाठी आधीपासूनच आहे, असं सरमा यांनी अलिकडेच सांगितलं होतं.