बीएचआर गैरव्यवहार: मुख्य सुत्रधार अवसायक जितेंद्र कंडारे यांस अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 29, 2021

बीएचआर गैरव्यवहार: मुख्य सुत्रधार अवसायक जितेंद्र कंडारे यांस अटक

https://ift.tt/3ha2ARE
म.टा.प्रतिनिधी, जळगाव भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारातील मुख्य सुत्रधार संशयित अवसायक जितेंद कंडारे याला सोमवारी रात्री उशीरा इंदोर येथिल एका जुन्या हॉस्टेलमधून पोलिसांनी अटक केली. कंडारे याला अटक झाल्यानतंर या गुन्ह्यातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Chief facilitator in ) बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत १८ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात बीएचआरशी संदर्भात सीए, मालमत्ता खरेदी करणारे व्यापारी, उद्योजक, ठेवींची मॅचींग करणाऱ्या बड्या हस्तींचा समावेश आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून कंडारे हा बेपत्ता झाला होता. त्याच्यासोबतचा दुसरा मुख्य संशयित सुनील झंवर हा देखील बेपत्ता आहे. या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करुन नोव्हेंबर महिन्यात ५ जणांना अटक केली होती. त्यानतंर नुकतेच राज्यभरात छापेमारे करुन ठेव पावत्यांचे मॅचिंग करुन कर्जफेड केल्याच्या संशयावरुन ११ जणांना अटक केली. यात भागवत भंगाळे, प्रेम कोगटा, जयश्री तोतला, अंबादास मानकापे, छगन झाल्टे, जितेंद्र पाटील, आसिफ तेली, जयश्री मणियार, संजय तोतला, राजेश लोढा, प्रितेश जैन यांचा समावेश आहे. क्लिक करा आणि वाचा- कंडारे इंरूरमध्ये असल्याची माहिती गेल्या आठवड्यात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पाच दिवसांपासून पोलिसांचे एक पथक इंदूरमध्ये थांबुन होते. सोमवारी रात्री आठ वाजता कंडारे जेवणासाठी खाली येताच त्याच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारी रात्री उशिरा पुण्यात नेण्यात येईल. क्लिक करा आणि वाचा-