
मुंबई: लोणावळा येथील चिंतन बैठकीत बोलताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी शिवसेनेच्या वाघाला डिवचणारं वक्तव्य केलं असून त्यावरच बोट ठेवत माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा सदस्य यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ( ) वाचा: नारायण राणे हे शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यात काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वाघाचा उल्लेख करत केलेल्या विधानाने राणे यांना शिवसेनेवर तोंडसुख घेण्याची चांगलीच संधी मिळाली. 'आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो', असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले होते. तोच धागा पकडत राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेनेला टोला हाणला आहे. 'आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत, म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतील असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार!', असे ट्वीट राणे यांनी केले आहे. काय म्हणाले होते वडेट्टीवार? लोणावळा येथील ओबीसी आरक्षण चिंतन बैठकीत सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. यावेळी जोरदार राजकीय टोलेबाजी रंगली. यात विजय वडेट्टीवार आणि यांनी सोडलेले वाक्बाण सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. 'मी अशा भागातील राहतो, जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले, तर परत जाऊ देणार नाही,' असे वडेट्टीवार म्हणाले असता व्यासपीठावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा' असे वक्तव्य केले. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी 'आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे,' असे म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला होता. त्यावर राणे यांनी तोंडसुख घेतले. वाचा: मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड? 'सिंधुदुर्ग-रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ केली, त्याबदल्यात शिवसेनेने करोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यू दिले. याला पूर्णपणे हे जबाबदार आहेत. दोन्ही जिल्ह्यांत डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षांच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीवासीयांच्या पदरी असं मरण आलं. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?', असा निशाणाही नारायण राणे यांनी अन्य ट्वीटच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर साधला आहे. वाचा: