लसीकरणादरम्यान अक्षम्य हलगर्जीपणा, डोस न भरताच तरुणाला दिले इंजेक्शन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 25, 2021

लसीकरणादरम्यान अक्षम्य हलगर्जीपणा, डोस न भरताच तरुणाला दिले इंजेक्शन

https://ift.tt/3xTIWjp
पाटणाः बिहारमध्ये करोनावरील लसीकरणादरम्यान अक्षम्य हलगर्जीपणा ( ) झाल्याचं समोर आलं. छपरामध्ये लस घेण्यासाठी आलेल्या तरुणाला एएनएमने डोस न भरतात इंजेक्शन दिलं. तरुणही आनंदात आपल्या घरी गेला. पण जेव्हा त्याच्या मित्रांने शूट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो हादरला. कारण एएनएमचा हलगर्जीपणा व्हिडिओत स्पष्टपणे दिसत होता. हे प्रकरण छपरा शहरातील वॉर्ड क्रमांक १ च्या उर्दू माध्यमिक शाळा ब्रह्मपूर इमामवाडा इथले आहे. या ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. २१ जूनला करोनावरील लसीकरणाच्या नावावर रिकामे इंजेक्शन टोकल्याचं समोर आलं आहे. एक महिला आरोग्य कर्मचारी सिरिंजचे रॅपर फाडून त्यात करोनावरील लसीचा डोस न भरताच इंजेक्शन देत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओत दिसणारा तरुण हा अजहर हुसेन नावाचा आहे. हा व्हिडिओ त्याचा मित्र अमन खानने काढला होता. या व्हिडिओमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची पोलखोल झाली आहे. आरोग कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळे करोनावरील लसीकरण मोहीमेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप होतोय. माझा मित्र व्हिडिओ बनवत होता. संध्याकाळी व्हिडिओ बघितल्यावर रिकाम्या सिरिंजमध्ये करोनावरील लसीचा डोस भरला नसल्याचं लक्षात आलं, असं अजहर हुसेनने सांगितलं. ही घटना सत्य आहे. या प्रकरणी आरोग्य कर्मचारी महिलेकडून स्पष्टीकरण मागितले असून तिला कामावरून हटवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकारी डॉ. मेजर अजय कुमार यांनी दिली.