प्रताप सरनाईकांच्या आरोपांकडं काँग्रेसचं दुर्लक्ष; फक्त एकच मुद्दा पकडला! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 21, 2021

प्रताप सरनाईकांच्या आरोपांकडं काँग्रेसचं दुर्लक्ष; फक्त एकच मुद्दा पकडला!

https://ift.tt/3cTcKVq
मुंबई: शिवसेनेचे आमदार यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून पुन्हा भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या पत्रामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी सरनाईक यांच्या पत्रावर सावध आणि माफक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले आहेत. हे पक्ष शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे. तर, केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेच्या आमदारांना व मंत्र्याना त्रास दिला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा त्रास थांबवण्यासाठी भाजपशी पुन्हा जुळवून घ्या, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे. वाचा: सरनाईक यांच्या आरोपांच्या मुद्द्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी बगल दिली आहे. 'सरनाईक यांनी लिहिलेलं पत्र मी वाचलेलं नाही. त्यांनी काही आरोप केले असतील तर पाहावं लागेल. मात्र, महाविकास आघाडी टिकावी याच मताचे ते आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटलं आहे. तर, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्याशी आमचा संबंध नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटलं आहे. पटोले यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते यांनीही आज ट्वीट केलं आहे. केंद्र सरकारला लक्ष्य करणारा सरनाईक यांच्या पत्रातील मजकूर सावंत यांनी ट्वीट केला आहे. 'प्रताप सरनाईक यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. मोदी सरकार तपास यंत्रणांचा खुलेआम वापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. येनकेन प्रकारे सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपा अत्यंत खालच्या पातळीवर उतरली आहे. सरनाईक यांचा मानसिक छळ होत आहे हे त्यांच्या पत्रातून लक्षात येतं,' असं म्हणत सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. वाचा: