भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ब्राझीलकडून कोवॅक्सिनसोबतचा करार रद्द - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 30, 2021

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ब्राझीलकडून कोवॅक्सिनसोबतचा करार रद्द

https://ift.tt/3h3JHAR
ब्राझिलिया: ब्राझीलने भारत बायोटेक कंपनीसोबत केलेल्या करोना लशीचा करार रद्द केल्याची घोषणा केली आहे. ब्राझीलमध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या करारावरून मोठा गदारोळ सुरू होता. त्यानंतर ३२ कोटी डॉलरचा करार रद्द झाला असल्याचे सरकारने म्हटले. ब्राझीलचे आरोग्यमंत्री मार्सेलो यांनी मंगळवारी ही घोषणा केली. या करारानुसार, ब्राझील सरकार भारत बायोटेक कंपनीकडून कोवॅक्सिन लशीचे दोन कोटी डोस खरेदी करणार होते. मात्र, या करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. राष्ट्रपती बोल्सनारोदेखील अडचणीत आले होते. वाचा: करोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची संसदीय समितीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्या चौकशीत ब्राझील सरकारने अधिक दरात खरेदी करण्यात आली असल्याचे दिसून आले. त्यानंतर ब्राझील सरकारच्या या करारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. याआधी फायजर कंपनीने ब्राझील सरकारला कोवॅक्सिनपेक्षा कमी दरात लस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ब्राझील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. वाचा: ब्राझीलच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लस खरेदी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत हा करार रद्द करण्यात आला आहे. मात्र, ब्राझील सरकारकडून सातत्याने या करारात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा करण्यात आला. ब्राझील सरकार आणि भारत बायोटेक दरम्यान फेब्रुवारीमध्ये करार झाला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती बोल्सनारो यांनी आरोप फेटाळून लावले होते. कोवॅक्सिन लशीवर एक पैसा खर्च केला नाही आणि आम्हाला कोवॅक्सिन लशीचा एकही डोस मिळाला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार झाला कुठे, असा उलट प्रश्न राष्ट्रपती बोल्सनारो यांनी केला. भ्रष्टाचार झाला असेल तर नक्कीच कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.