Breaking News सामना सुरू असताना मैदानावर कोसळला दिग्गज फुटबॉलपटू; CRP दिले, मॅच निलंबित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 13, 2021

Breaking News सामना सुरू असताना मैदानावर कोसळला दिग्गज फुटबॉलपटू; CRP दिले, मॅच निलंबित

https://ift.tt/2TXm2ZT
कोपनहेगन: युरो कप २०२० स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. डेन्मार्क वि. फिनलंड या दोन संघांच्या लढतीत सर्वांचा श्वास रोखला गेला जेव्हा डेन्मार्कचा दिग्गज मिडफिल्डर ख्रिस्टियन एरिक्सन अचानक मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळला. कोपनहेगनच्या पार्केन स्टेडियममध्ये शनिवारी ही मॅच सुरू होती. पहिल्या हाफमधील खेळ संपन्याच्या आधी एरिक्सन मैदानावर कोसळला. एरिक्सला मैदानावर कोसळताना पाहून दोन्ही संघातील खेळाडू आणि मैदानावरील रेफरी एथनी टेलर यांनी सामना थांबवला. त्याला तातडीने वैद्यकीय सुविधा दिली गेली. एरिक्सला मैदानावरच सीपीआर दिला गेला आणि उपचार करण्यात आली. या दरम्यान, गोपनीयता राखण्यासाठी खेळाडू त्याच्या भोवती वर्तुळ करून उभे होते. त्यानंतर एरिक्सला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले. या घटनेनंतर सामना तातडीने स्थगित करण्यात आला. एरिक्सन जेव्हा मैदानावर कोसळला तेव्हा खेळाडू आणि चाहते सर्व जण हैराण झाले. संपूर्ण मैदानात शांतता पसरली. काही चाहत्यांच्या डोळ्यात आश्रू देखील होते. तर डेन्मार्क संघातील खेळाडू रडू लागले. सोशल मीडियावर एरिक्सनचे चाहते त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. सामना स्थगित करण्यात आला होता पण काही मिनिटांनी तो वैद्यकीय कारणामुळे निलंबित करण्यात आला. या सामन्यात १५ हजार चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला होता.