लोणारमध्ये चोरट्यांचा विदेशी दारूवर डल्ला; CCTV चा डीव्हीआरही पळवला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 2, 2021

लोणारमध्ये चोरट्यांचा विदेशी दारूवर डल्ला; CCTV चा डीव्हीआरही पळवला

https://ift.tt/3uJ2vcg
बुलडाणा: जिल्ह्यातील तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अजूनही हे सत्र थांबायचे नाव घेत नाही, ज्यामध्ये मोटारसायकल, जनावरे, रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने यांचा समावेश आहे तर आज चोरट्यांनी चक्क विदेशी दारूवर हात साफ केला आहे. हे कमी म्हणून की काय, चोरट्यानी एका बारमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला आहे. लोणार तालुक्यातील बीबी येथे ही घटना घडली आहे. बीबी येथील रामदास काळे यांच्या मालकीचे संगम वाइन बार आहे. मंगळवारी रात्री अज्ञात इसमांनी वाईन बारमध्ये प्रवेश केला. तिथून बारमधील रोख २५ हजार रुपये व दीड लाख रुपयांची विदेशी दारू पळवली. सोबत सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाइट फोडून डीव्हीआर सोबत नेले. दारू आणि रोख रकमेसह एकूण पावणे दोन लाख रुपये चोरीला गेले आहेत. वाचा: या प्रकरणी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, चोरीच्या सततच्या घटनांमुळं पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा परिसरात आहे. वाचा: