लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या सलून व्यावसायिकाची आत्महत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 5, 2021

लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या सलून व्यावसायिकाची आत्महत्या

https://ift.tt/3qSUyRB
जळगाव: सततच्या मुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने व झाल्याने जळगावातील एका व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता ही घटना उघडकीस आली. (वय ३५, रा. लक्ष्मीनगर) असे मृत सलून व्यवसायिकाचे नाव आहे. ( ) वाचा: गजानन वाघ गेल्या वर्षीपासून शहरात स्थायिक झाले होते. लक्ष्मीनगरात खोली भाड्याने घेऊन तिथे ते पत्नी व दोन मुलांसह राहत होते. सलून दुकानावर कारागीर म्हणून ते काम करीत होते. पहील्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे दुकाने बंद पडली. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला होता. सुरुवातीच्या काळात सलून दुकानदारांकडून काही प्रमाणात मदत मिळाली. मात्र लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे वाघ यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली. त्यातून त्यांनी हातउसनवारी करून घरखर्च भागवण्यास सुरुवात केली. वाचा: अनलॉक झाल्यांनतरही पुरेसे काम त्यांना मिळत नव्हते. डोक्यावरील कर्ज वाढत चालले होते. यातून पैसे परत मागणाऱ्यांचा तगादा सुरू झाला होता. याच विंवचनेत असलेल्या वाघ यांनी शनिवारी मध्यरात्री राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ८.३० वाजता त्यांच्या पत्नी सरला यांच्या हा प्रकार लक्षात आला. लहान भाऊ इश्वर याच्यासह परिसरातील नागरीकांनी वाघ यांना खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. रविवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी माळपिंप्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत गजानन वाघ यांच्या पश्चात पत्नी सरला, आई लताबाई, मुलगा ऋषीकेश (वय ५) व मुलगी वैष्णवी (वय ३) असा परिवार आहे. वाचा: