अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायालयाचा दणका, ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 29, 2021

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायालयाचा दणका, ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

https://ift.tt/3l68HtZ
: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी युवकाला न्यायालयाने ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. जिल्ह्यातील गोपगव्हाण येथील एका २० वर्षे युवकाने नळावर पाणी भरत असलेल्या युवतीवर विनयभंग केल्याची घटना २५ नोव्हेंबर २०२० मध्ये घडली होती. विनयभंगाच्या या घटनेला गांभीर्याने घेत न्यायालयाने आरोपी युवकाला चांगलाच धडा शिकवल्याने असं कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या खटल्यावर निकाल देत बुधवारी न्यायालयाने आरोपी युवकाला तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. पोरगव्हाण येथील एक १७ वर्षीय युवती नळावर पाणी भरत असताना आरोपी युवकाने तिचा हात पकडून स्वतःच्या अंगावर ओढून घेत तिचा विनयभंग केला. तसंच नंतर मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात पीडित मुलीने आकाश गजानन पवार वय २० वर्ष राहणार गोपगव्हाण या युवकाविरुद्ध बडनेरा येथे तक्रार दिली होती. त्यानंतर सदर युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आज बुधवारी न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. यातील आरोपी युवकाला तीन वर्षाची सक्तमजुरी शिक्षा देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंजाब बंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी गुल्हाने यांनी या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची भूमिका निभावली.