नवी दिल्लीः करोना व्हायरसचा डेल्टा वेरियंटचा प्रादुर्भाव हा अनेक देशांत झाला आहे. आता या डेल्टा वेरियंटवर लस किती प्रभावी आहे? यावर अनेक ठिकाणी अभ्यास केला जात आहे. दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्येही डेल्टा वेरियंटवरील लसीच्या प्रभावाचा अभ्यास केला गेला. यात करोनाच्या डेल्टा वेरियंटवर लस ८ पट कमी प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. हा अभ्यास सर गंगाराम हॉस्पिटल्स देशातील तीन केंद्रांवर १०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आला होता. करोनाचा डेल्टा वेरियंट बी.1.617.2 हा शरीरात वेगाने पसरतो आणि श्वसनावर त्याचा मोठा परिणाम होतो. एवढचं नव्हे तर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही याचा संसर्ग अधिक होतो, असं अभ्यासातून समोर आलं आहे. अँटिबॉडी ८ पट कमी प्रभावी केम्ब्रिज इन्स्टिट्यूट ऑफ थेराप्युटिक इम्युनोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसिसच्या शास्त्रज्ञांसोबत केलेला अभ्यास, सार्स-सीओवी-२ बी.1.617.2 डेल्टा वेरियंट इमर्जन्सी अँड वॅक्सिन ब्रेकथ्रूः कोलॅबोरिटिव स्टडी, यांची समीक्षा करणं बाकी आहे. पण डेल्टा वेरियंटवर शरीरात लीसद्वारे तयार झालेल्या अँटीबॉडी या ८ पट कमी प्रभावी असल्याचं अभ्यासात समोर आलं आहे. तसंच बी .1.167.2 हा डेल्टा वेरियंट ब्रिटनमधील बी.1.1.7 च्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असल्याचं अभ्यासात म्हटलं आहे. करोनाच्या महामारीत आपल्याला आणखी खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आपण आपली सुरक्षा कमी केल्यास आपल्याला संसर्गाचा धोका आहे. अशाने व्हायरसला संधी दिल्यास त्याच्यात म्युटेश म्हणजेच आणखी बदल होणार हे निश्चित आहे, असं इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इम्युनोलॉजी, एसजीआरएचचे अध्यक्ष डॉ. चंद वट्टल यांनी सांगितलं. 'व्हायरस शिकारीच्या शोधात आहेत' लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे डोळे उघडणारा हा प्रकार आहे. लस घेतल्यानंतरही तुम्ही करोनाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेतलीच पाहिजे. व्हायरस आता आपल्या शिकारीवर निघाला आहे. आणि तो आपल्या शिकारीच्या शोधात आहे, असं वट्टल म्हणाले.