डेहराडूनः उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. पण त्यापूर्वीच यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ( ) दिल्याने उत्तराखंडला आता काही महिन्यांसाठी नवा मुख्यमंत्री ( ) मिळणार आहे. डेहराडूनमध्ये भाजपच्या आमदारांची उद्या दुपारी बैठक होणार आहे. या बैठकीत आमदारांपैकी एकाची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली जाईल. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ४ जणांची नावं चर्चेत आहेत. यात मंत्री धन सिंह रावत, बंशीधर भगत, हरक सिंह रावत आणि सतपाल महाराज यांचा समावेश आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी ४ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १० मार्च २०२१ ला पौडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार तीरथ सिंह रावत हे नवे मुख्यमंत्री झाले. नियमानुसार तीरथ सिंह रावत यांना सहा महिन्यात म्हणजेच १० सप्टेंबरपर्यंत विधानसभेवर निवडून जाणं गरजे होतं. राज्यात गंगोत्री आणि हल्द्वानी या दोन जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. पण करोना संकटामुळे पोटनिवडणूक कधी घ्यायची? हा निर्णय निवडणूक आयोगावर अवलंबून आहे. धन सिंह रावतांना संघाचा आर्शीवाद मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राज्य सरकारमधी उच्च शिक्षणमंत्री धन सिंह रावत यांचे नाव आघाडीवर आहे. रावत हे श्रीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. धन सिंह रावत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कॅडरमधून आले आहेत. उत्तराखंड भाजपमध्ये संघटन मंत्री होते. ७ ऑक्टोबरला १९७१ त्यांचा जन्म झाला. ते मुळचे पौडी गढवालचे रहिवासी आहेत. त्यांनी दोनवेळा एमए आणि राज्यशास्त्रात पीएचडी केली आहे. बंशीधर भगतही दावेदार उत्तराखंड सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बंशीधर भगत हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जातात. ते काळाढुंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विविध सरकारांमध्ये ते मंत्री होते. २००२ च्या विधानसभा निवडणुकीत हल्दानी मतदारसंघातून काँग्रेसच्या डॉ. इंदिरा हृदयेश यांनी त्यांचा पराभव केला होता. हरक सिंह रावतही शर्यतीत हरक सिंह रावत हे कॅबिनेट मंत्री आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचेही नाव घेतले जात आहे. हरक सिंह रावत यांच्याकडे सद्या आयुष आणि आयुष शिक्षणसह अनेक महत्त्वाची खाती आहेत. उत्तराखंडच्या निर्मितीत सतपाल महाराजांची मोठी भूमिका पर्यटनमंत्री सतपाल महाराजांचे नावही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. सतपाल महाराज यांनी उत्तराखंडच्या स्थापनेत मोठी भूमिका बजावली होती. खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, आय. के. गुजरात आणि पश्चिम बंगाले मुख्यमंत्री ज्योती बसु यांच्यावर उत्तराखंड हे वेगळे राज्य बनवण्यासाठी दबाव आणला होता. २१ मार्च २०१४ ला काँग्रेस सोडत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
https://ift.tt/3yhrTYP