 
म. टा. प्रतिनिधी, मुंबई शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून मतभेद झाले. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी केली. मात्र शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद द्या, अशी सूचना सत्तासंघर्षाच्या काळात यांना मी केली होती. माझे ते म्हणणे फडणवीसांनी ऐकले असते तर ते आज मुख्यमंत्री असते, असे रिपब्लिकन नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री यांनी रविवारी मुंबईत सांगितले. तुमच्या दोघांत एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असेही आठवले यांनी हसतहसत सांगितले. सन्मान देवदूतांचा हा विशेष कार्यक्रम मुंबईत रविवारी झाला. या कार्यक्रमात करोनायोद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आरोग्यमंत्री , विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. या कार्यक्रमात आठवले यांनी आपल्या चारोळ्यांतून टोपे यांचे कौतुक केले. करोनाकाळात टोपे यांनी उत्तम काम केले. घरच्या कुटुंबाप्रमाणे महाराष्ट्राच्या नागरिकांची काळजी घेतली. विरोधक असलेल्या भाजपनेही करोनाकाळात टोपे यांच्यावर कधी टीका केली नाही. 'करोनाच्या काळात आरोग्य मंत्रालय चालवणे नव्हते सोपे, पण त्याला पुरून उरले राजेश टोपे', अशा शब्दांत आठवले यांनी टोपे यांचे कौतुक केले.
 
 
 
 
 
