आज पुन्हा पेट्रोल भडका ; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल महागले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 5, 2021

आज पुन्हा पेट्रोल भडका ; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल महागले

https://ift.tt/3wfVHUw
मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या दरवाढीने पेट्रोलियम कंपन्यांचा आयात खर्च वाढला आहे. त्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला असून सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किमतीत वाढ केली आहे. आज सोमवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये ३५ पैसे वाढ केली आहे. काल रविवारी देशभरात पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल १८ पैशांनी महागले होते. या दरवाढीने ३६ दिवसांत पेट्रोल ९.५४ रुपयांनी महागले आहे. आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०५.९२ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल ९९.९६ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा १००.७५ रुपये इतका झाला आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९९.८४ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०८.१६ रुपये इतका झाला आहे. भोपाळमध्ये प्रिमियम पेट्रोल ११० रुपयांवर गेले आहे. मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९६.९१ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.३६ रुपये आहे. चेन्नईत ९३.९१ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.२७ रुपये प्रती लीटर आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.१३ रुपये झाला आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे. जागतिक बाजारात आज ब्रेंट क्रूडचा भाव ७६ डॉलर प्रती औंस आहे. गेल्या आठवड्यातील सरासरी किमतीच्या तुलनेत कच्च्या तेलाचा भाव ०.१७ डॉलरने कमी आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.१५ डॉलरने कमी झाला असून तो ७५.०१ डॉलर प्रती बॅरल झाला आहे.