
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आपल्या इंग्रजी शब्दांच्या शब्द साठ्याकरता प्रसिद्ध आहेतच... आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना शशी थरुर यांच्या पोतडीतून एक दुर्मिळ बाहेर पडलाय. नुकताच शशी थरुर यांना एक नवीन इंग्रजी शब्द सापडलाय. हाच शब्द आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. हा शब्द आहे '' 'पोगोनोट्रॉफी' या इंग्रजी शब्दाचा अर्थ होतो दाढी वाढवणं. शशी थरुर यांनी या शब्दाचा वाक्यात वापर कसा करायचा हे समजावताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लांब दाढीचा उल्लेख केलाय. 'मी एक नवा शब्द शिकण्याची वाट पाहत आहे', असं शशी थरुर यांना सोशल मीडियावरून आर्जव करणाऱ्या एका युझरला उत्तर देताना शशी थरुर यांनी या नव्या शब्दाचा वापर केलाय. 'माझी अर्थशास्त्रज्ञ मित्र रतिन रॉय यांनी मला ' (pogonotrophy) एक नवा शब्द शिकवला आहे. याचा अर्थ होतो दाढी वाढवणं... पंतप्रधान नरेंद्र मोदीही करोनाकाळात दाढी वाढवताना दिसले' असं म्हणत या शब्दाचा वाक्यात उपयोग कसा करायचा हेही शशी थरुर यांनी युझरला समजावून सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीवर कमेंट करण्याची शशी थरुर यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी, ३ मार्च रोजी देशाच्या जीडीपीची तुलना पंतप्रधान मोदींच्या दाढीशी केली होती.