लोकल पाससाठी पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा संमिश्र प्रतिसाद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 12, 2021

लोकल पाससाठी पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा संमिश्र प्रतिसाद

https://ift.tt/3AEMebZ
म. टा. प्रतिनिधी, मुंबई स्वस्त आणि वेगवान प्रवासासाठी पहिल्याच दिवशी २१ हजार ७८५ लसधारकांची पडताळणी, अर्थात ओळखपरेड पूर्ण करून त्यांना पास देण्यात आले. मध्य रेल्वेवरील डोंबिवली, तर पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकात सर्वाधिक पासविक्री नोंदवण्यात आली. गर्दी नियोजनाचा भाग म्हणून लसधारकांना दैनंदिन तिकीट, त्रैमासिक, सहामाही पास देण्यात येणार नाहीत. मुंबईतील करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्य सरकार टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करत आहे. त्यानुसार करोनाप्रतिबंधक लशींच्या दोन मात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकलप्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी महामुंबईतील रेल्वे स्थानकांवर पालिकेकडून लसधारकांची ओळखपरेड सुरू करण्यात आली आहे. यातून मध्य रेल्वेवर बुधवार सायंकाळी ६पर्यंत १६ हजार ७९८ पासची विक्री झाली. सर्वाधिक पासची विक्री डोंबिवली (१,२१७), कल्याण (९१२), मुलुंड (८५१), सीएसएमटी (७८५), ठाणे (६७१) आणि बदलापूर (६३६) या स्थानकांत नोंदवण्यात आली. पश्चिम रेल्वेवर दुपारी २.३०पर्यंत चार हजार ९८७ पासची विक्री झाली. यात ९७५ प्रथम दर्जाच्या आणि चार हजार १२ द्वितीय दर्जाचे पासचा समावेश आहे. बोरिवली स्थानकात सर्वाधिक अर्थात ४४९ पासची विक्री झाल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. लक्षात घेता राज्य सरकारने सध्या अत्यावश्यक प्रवासी आणि लसधारकांना प्रवासाची मुभा दिलेली आहे. परंतु एक मात्रा घेतलेला १८ ते ४४ वयोगटातील तरुण नोकरदार वर्ग अद्याप लोकलप्रवासाच्या प्रवाहाबाहेरच आहे. ५३ स्थानकांवर, ३५८ पडताळणी केंद्र मुंबई महापालिकेने पालिका हद्दीतील ५३ रेल्वे स्थानकांवर ३५८ पडताळणी केंद्र सुरू केली आहेत. रोज सकाळी ७ ते रात्री ११पर्यंत ती केंद्र सुरू राहणार आहेत. दरम्यान, पडताळणी प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी रेल्वे स्थानकांवर भेट दिली.