करोनाविरोधात अर्धी लढाई जिंकली! ५० कोटींहून अधिक नागरिकांना दिली लस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 7, 2021

करोनाविरोधात अर्धी लढाई जिंकली! ५० कोटींहून अधिक नागरिकांना दिली लस

https://ift.tt/3s0sTi0
नवी दिल्ली: देशात करोना लसीकरण मोहिमेने एक मोठा टप्पा गाठला आहे. देशात आतापर्यंत करोनावरील लसीचे ५० कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. देशात शुक्रवारी ४३.२९ लाख नागरिकांना करोनाची ( ) लस दिली गेली आहे. लसीकरण मोहिमेचा हा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. सरकारने 'सर्वांसाठी लस, मोफत लस' या मोहीमेअंतर्गत सर्व नागरिकांचे लसीकरण ( ) करणार आहे, असं पंतप्रधान मोदी ( ) म्हणाले. देशात आतापर्यंत करोना लसीचे ५० कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. ४० कोटी ते ५० कोटींचा आकडा हा अवघ्या २० दिवसांत पूर्ण झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. 'करोनाविरोधात भारताच्या लढाईने आता वेग पकडला आहे. लसीकरणाचा आकडा हा ५० कोटींवर गेला आहे. लसीकरण मोहीम अशाच प्रकारे सुरू राहील. सर्वांना 'लस, मोफत लस' या धोरणानुसार सर्व नागरिकांना लस दिली जाईल, अशी आशा आहे', असं पंतप्रधान मोदी ट्वीटमध्ये म्हणाले. देशातील करोनावरील लसीकरण मोहीमेला या महिन्यापासून आणखी वेग मिळणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या लस उत्पादन करणाऱ्या दोन कंपन्या मिळून महिन्याला आणखी ४ कोटींहून अधिक डोसचे उत्पादन करणार आहेत. याचा थेट फायदा देशाला होणार आहे, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. कोविशिल्ड लसीचे आता महिन्याला १२ कोटी डोसचे उत्पादन होईल. आधी ११ कोटी डोसचे उत्पादन केले जात होते, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटने दिली. तर भारत बायोटेक आपली कोवॅक्सिन लसीचे उत्पादन २.५ कोटींहून वाढवून ५.८ कोटीं करणार आहे. यानुसार देशाला वर्षाअखेरपर्यंत १३६ कोटी डोसचा पुरवठा केला जाणार आहे. देशात १६ जानेवारीपासून करोनावरी लसीकरण मोहीम सुरू आहे. २१ जूनपासून केंद्र सरकारने संपूर्ण लसीकरण मोहीम आपल्या हाती घेतली. यानंतर केंद्र सरकार लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून लसीचे ७५ टक्के डोस खरेदी करून राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना मोफत देत आहे. तर २५ टक्के डोसचा पुरवठा हा खासगी हॉस्पिटल्ससाठी ठेवण्यात आला आहे.