गोवा-मुंबईमार्गे रेल्वेगाड्यांतून मद्यतस्करी; तिघांना अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 7, 2021

गोवा-मुंबईमार्गे रेल्वेगाड्यांतून मद्यतस्करी; तिघांना अटक

https://ift.tt/3AiGrZh
म. टा. प्रतिनिधी : गोवा-मुंबईमार्गे रेल्वेगाड्यांतून परराज्यांत मोठ्या प्रमामावर मद्यतस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असू, विदेशी मद्याच्या १,४९८ बाटल्या गुजरात एक्स्प्रेसमधून जप्त करण्यात आल्या. गाडी क्रमांक ०६३३४ त्रिवेंद्रम-वेरावल एक्स्प्रेसमध्ये गोव्याहून आलेले तीन प्रवासी गुजरात येथे विदेशी मद्य नेत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. ही गाडी पनवेल स्थानकात आली असता, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, हवालदार महेश सुर्वे, शौकत मुजावर, पोलिस नाईक हितेश नाईक आणि पथकाने संपूर्ण ट्रेनची तपासणी सुरू केली. पनवेल ते वसई रोड स्थानकांदरम्यान गाडीमध्ये तपास करीत असताना पोलिसांना तीन संशयित व्यक्ती आढळल्या. त्यांच्याकडून व्हॅट ६९ कंपनीच्या ८५०, टिचर्स कंपनीच्या ४४८, ब्लॅक अँड व्हाइट कंपनीच्या २०० अशा बाटल्या कारवाईअंतर्गत जप्त करण्यात आल्या. या सर्व बाटल्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख ८६ हजार ५७६ रुपये आहे. भावेश पटेल, संजय वंजारा आणि मनीष सोनावणे अशी या आरोपींची नावे आहेत. हे तिघे अहमदाबाद येथे वास्तव्यास आहेत. हे आरोपी गोव्यातून स्वस्त दरात मद्य विकत घेऊन गुजरातमध्ये ठिकठिकाणी विकत असल्याची माहिती समोर आली.