कच्च्या तेलाचा भाव घसरला : हा आहे आजचा पेट्रोल आणि डिझेलचा दर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 7, 2021

कच्च्या तेलाचा भाव घसरला : हा आहे आजचा पेट्रोल आणि डिझेलचा दर

https://ift.tt/3jwYzrF
मुंबई : संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने कंपन्यांनी तूर्त पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. आज सलग २१ व्या दिवशी पेट्रोल आणि 'जैसे थे'च आहे. एकीकडे जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव कमी होत असला तरी पेट्रोलियम कंपन्या कपात करत नसल्याने सामन्यांमध्ये संतापाची लाट आहे. मुंबईत आज शनिवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे. आज शनिवारी मुंबईत डिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव ०.९१ टक्क्यांनी कमी होऊन ७०.६४ डॉलर झाला. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.३३ टक्के घसरला आणि तो ६८.१७ डॉलर प्रती बॅरल झाला. अमेरिकेत कोव्हीड-१९ च्या डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. डेल्टाचे रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्यता गडद बनली आहे.