नवी दिल्ली : आज (सोमवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (१ ऑगस्ट २०२१) ४० हजार १३४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी १६ लाख ९५ हजार ९५८ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख १३ हजार ७१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी ३६ हजार ९४६ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ०८ लाख ५७ हजार ४६७ वर पोहचलीय. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ४२२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख २४ हजार ७७३ वर पोहचलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील रिकव्हरी दरात वाढ होऊन हा दर ९७.३५ टक्क्यांवर आहे. तर देशाचा दैनिक पॉझिटिव्हिटी रेट २.८१ टक्क्यांवर आहे.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी १६ लाख ९५ हजार ९५८
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी ०८ लाख ५७ हजार ४६७
- उपचार सुरू : ४ लाख १३ हजार ७१८
- एकूण मृत्यू : ४ लाख २४ हजार ७७३
- करोना लसीचे डोस दिले गेले : ४२ कोटी ७८ लाख ८२ हजार २६१