युएईतील परदेशी डॉक्टरांना सरकारकडून 'ही' भेट; भारतीयांना होणार फायदा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 2, 2021

युएईतील परदेशी डॉक्टरांना सरकारकडून 'ही' भेट; भारतीयांना होणार फायदा

https://ift.tt/3fnvBt7
दुबई: संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या भारतीय डॉक्टरांना तेथील सरकारने मोठी भेट दिली आहे. या डॉक्टरांना गोल्डन व्हिसा मिळणार आहे. गोल्डन व्हिसा देण्यासाठी फेडरस ऑथिरिटी फॉर आयडेंटिटी अॅण्ड सिटिझनशीपने (ICA) 'गोल्डन रेजिडेसी सर्व्हिसेस'ची सुरुवात करण्यात येणार आहे. दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या निर्देशानंतर या गोल्डन व्हिसाची सुरूवात होणार आहे. भारतीय डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना १० वर्षासाठी गोल्डन व्हिसा मिळणार आहे. आयसीएचे कार्यवाहक महासंचालक मेजर जनरल सुहैल सईद अल खली यांनी म्हटले की, युएईतील सर्व डॉक्टरांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गोल्डन व्हिसा देण्यात येणार आहे. करोना महासाथीचा आजार रोखण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय डॉक्टर मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करत आहेत. त्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. वाचा: आयसीए आरोग्य आणि संसर्ग आजार नियंत्रण मंत्रालय व अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहे. जेणेकरून युएईतील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी गोल्डन व्हिसा देण्याच्या प्रक्रियेला वेग देता येईल असे खली यांनी म्हटले. या निर्णयामुळे जगभरातील वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक अमिरातीकडे आकर्षित होण्याचा विश्वास असून त्याद्वारे देशातील आरोग्य व्यवस्था अधिक चांगली होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा व्हिसा देण्यामागे अमिराती सरकारचे काही उद्दिष्ट्य आहे. शिक्षण, नोकरी आणि वास्तव्यासाठी जगात प्राधान्य असलेल्या देशांच्या यादीत अमिरातीचा समावेश व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे.