करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा; गृहमंत्रालयाच्या समितीचा PMO ला अहवाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 23, 2021

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा; गृहमंत्रालयाच्या समितीचा PMO ला अहवाल

https://ift.tt/3j8ZHTf
नवी दिल्लीः नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट अंतर्गत (NIDM) नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सरकारला इशाला दिला आहे. करोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येऊ शकते. यात खासकरून प्रौढांपेक्षा लहान मुलांना अधिक धोका असून त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय तयारी करावी, अशी सूचना समितीने केली आहे. ही समिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशावरून स्थापन करण्यात आली आहे. लहान मुलांवर उपचार सुविधा, डॉक्टर, स्टाफ, वैद्यकीय उपकरणं उदा. व्हेंटिलेटर्स, अॅम्ब्युलन्स इत्यादी बाबींची सुविधा उपलब्ध करावी. तसंच अंदापेक्षाही अधिक लहान मुलांना करोनाचा संसर्ग झाल्यास कुठल्याही गोष्टीचा सामना करण्यासाठी तयारी ठेवावी, असं समितीने पंतप्रधान कार्यालयाला दिलेल्या अहवालात म्हटलं आहे. लहान मुलांना प्राधान्याने करोनावरील लस देणं गरजेचं आहे. खासकरून गंभीर आजार असलेल्या आणि व्यंग असलेल्या मुलांना लस द्यावी. करोनाची तिसरी लाट ऑक्टोबर अखेर टिपेला पोहोचू शकते. यामुळे विविध संस्थांकडून लाटेबाबत अंदाज घेण्याची सूचना द्यावी, असं समितीने अहवालात म्हटलं आहे. अनेक अभ्यासातून करोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तण्यात आला आहे. लहान मुलांना करोनावरील लस देण्यात येत नसल्याने त्यांना संसर्गाचा अधिक धोका आहे. लहान मुलांमध्ये करोनाचा संसर्ग गंभीर होत नाही. पण लहान मुलांद्वारे इतरांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तर दुसऱ्या लाटेपेक्षा करोनाची तिसरी लाटही तेवढी धोकादायक नसेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आलं आहे.