अंबरनाथमध्ये भीषण अपघात: ४ जणांचा मृत्यू; रिक्षाचा चक्काचूर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 13, 2021

अंबरनाथमध्ये भीषण अपघात: ४ जणांचा मृत्यू; रिक्षाचा चक्काचूर

https://ift.tt/3z6AdKU
: शहरातील पालेगाव भागातील नवीन एमआयडीसी इथे कार आणि रिक्षाची धडक झाल्याने झाला. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या धडकेनंतर रिक्षाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले. वर्षा वलेचा (वय ५१), आरती वलेचा (वय ४१), राज वेलेचा (वय १२) आणि रिक्षा चालक किशन विठ्ठल शिंदे अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.