किरीट सोमय्यांकडून उद्या आणखी गौप्यस्फोट; कोण असणार रडारवर? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 12, 2021

किरीट सोमय्यांकडून उद्या आणखी गौप्यस्फोट; कोण असणार रडारवर?

https://ift.tt/3yZBC61
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री आपले लक्ष्य असून येत्या सोमवारी या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचे भाजप नेते यांनी शनिवारी सांगितले. मात्र त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावे उघड न केल्याने त्याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात २४ हजार पाने आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पाने आहेत. तो यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार आहेत. त्यांनी मला मोकळीक दिलेली आहे. सोमवारी ही नावे मी उघड करणार आहे. तुम्ही चांगले काम करत आहात. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असे फडणवीस यांनी मला सांगितले आहे. त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार आहेत, असेही सोमय्या म्हणाले.