अमित शहा आजपासून जम्मू-काश्मीर दौऱ्यावर, कलम ३७० हटवल्यानंतर पहिलाच दौरा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 23, 2021

अमित शहा आजपासून जम्मू-काश्मीर दौऱ्यावर, कलम ३७० हटवल्यानंतर पहिलाच दौरा

https://ift.tt/3B0Liyk
नवी दिल्लीः कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रथमच आजपासून ३ दिवसांच्या श्रीनगर दौऱ्यावर जात आहेत. गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आयबी, एनआयए, लष्कर, सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तळ ठोकून असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकारी प्रत्येक गोपनीय माहितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. या भेटीत गृहमंत्री अमित शहा काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांसह स्थानिक सामाजिक संस्था आणि व्यापारी संघटनांना भेटतील आणि काश्मीरच्या विकासावर चर्चा करतील. जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ अ ५ ऑगस्ट २०१९ रद्द करण्यात आले. तेव्हापासून सर्वांच्या नजरा गृहमंत्री अमित शहा यांच्या काश्मीर दौऱ्यावर होत्या. वेळ आल्यावर काश्मीरला भेट देणार असल्याचेही शहा म्हणाले होते. गेल्या दोन महिन्यांत ५० हून अधिक केंद्रीय मंत्र्यांनी जम्मू -काश्मीरच्या विविध जिल्ह्यांचा दौरा केला. सोबतच केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेतला. अमित शहा २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान काश्मीरमध्ये असतील. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (SKICC) विविध राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळ, काश्मीर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, हाऊस बोट असोसिएशन, काश्मीर चेंबर्स ऑफ कॉमर्स, सुरक्षा संस्था आणि काश्मीर सरकारमधील अधिकाऱ्यांसोबत ते बंद खोलीत चर्चा करतील. तर २४ ऑक्टोबरला ते जम्मूमध्ये भाजपच्या रॅलीला संबोधित करतील. शहांचे दहशतवादी संघटनांना उत्तर अमित शहा यांचा हा दौरा आणखी महत्त्वाचा ठरतो. कारण गेल्या एका महिन्यात दहशतवाद्यांनी आपली रणनीती बदलली आणि ते सामान्यांची हत्या करत आहेत. गेल्या एका महिन्यात ११ निष्पाप नागरिकांची हत्या केली गेली. गृहमंत्री शहा यांनी काश्मीरचा दौरा करू नये यासाठी दहशतवादी संघटना अधिक सक्रिय झाल्या असं बोललं जातंय. पण गृहमंत्री शहा यांनी या भेटीबाबत अधिक सक्रियता दाखवली. यासोबतच सुरक्षा यंत्रणांना दहशतवादी संघटनांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिणामी गेल्या १५ दिवसांत १३ दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला. श्रीनगरच्या प्रत्येक रस्त्यावर तिरंगा फडकतोय अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात श्रीनगरच्या जवळपास सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर तिरंगी झेंडे लावण्यात आला आहेत. डल लेक ते हॉटेल सेंटॉरपर्यंतचा रस्ता सुंदर सजवण्यात आला आहे. SKICC इमारतीच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. भाजप नेत्यांमध्ये उत्साह गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याबद्दल भाजप नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. स्थानिक काश्मिरींना अमित शाह यांच्या भेटीपासून मोठ्या आशा आहेत. खऱ्या अर्थाने त्यांची भेट काश्मीरच्या विकासात आणि दहशतवादाविरोधातील लढाईत महत्त्वाची सिद्ध होईल. सामान्य काश्मिरींना शांतता हवी आहे. आमचे सरकार देखील शांततेच्या बाजूने आहे, असं जम्मू -काश्मीर भाजपचे सरचिटणीस सुनील शर्मा यांनी सांगितले.