आर्यन खान प्रकरणी या व्यक्तीची एनसीबीने केली तब्बल सात तास चाैकशी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 13, 2021

आर्यन खान प्रकरणी या व्यक्तीची एनसीबीने केली तब्बल सात तास चाैकशी

https://ift.tt/3iQD8SX
मुंबई : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आलिशान क्रूझ शिपमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य सात जणांना अटक केली होती. या प्रकरणात आर्यन खानला एनसीबी कोठडीतून न्यायालयीन कोठडीत हलवण्यात आले आहे. अमली पदार्थ प्रकरणी एनसीबीकडून सुरू असलेल्या तपासातून दररोज नवनवे खुलासे होत आहेत. प्रचंड दबाव असूनही एनसीबी अधिकाऱ्यांकडून वेगाने तपास सुरू आहे. असे म्हणतात की, आर्यन खानसह अरबाज मर्चंट, प्रतीक गाबा आणि आणखी एक व्यक्ती मन्नत बंगल्यातून मर्सिडीज कारमधून एकत्रच क्रूझमधील पार्टीसाठी निघाले होते. आता या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या प्रतीक गाबाची एनसीबीकडून तब्बल सात तास चाैकशी झाल्याचे समोर आले आहे. अद्याप कोणालाही क्लिन चीट नाही एनसीबी प्रतीक गाबाला चाैकशीसाठी पुन्हा बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात कोणालाही क्लिन चीट देण्यात आलेली नाही. एनसीबीकडून हे तेव्हा स्पष्ट करण्यात आले, जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीवर, प्रतीक गाबा, आमिर फर्निचरवाला व ऋषभ सचदेवा यांना छापेमारीदरम्यान क्रूझमधून सोडण्यात आल्याचा आरोप केला होता. शाहरुख खानच्या वाहनचालकाचीही झाली चाैकशी आर्यन खानने त्याच्या जबाबात म्हटले होते की, तो क्रूझवर कोणासोबत गेला नव्हता, त्याला या पार्टीत एक सेलिब्रिटी म्हणून बोलावण्यात आले होते. मात्र एनसीबीने जेव्हा शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चाैकशी केली तेव्हा सर्व सत्य समोर आले. ड्रायव्हरच्या सांगण्यानुसार त्याने अरबाज व आर्यन यांना एकत्र क्रूझ टर्मिनसवर सोडले होते. आर्यन खानचा जामिन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या आर्यन खान मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या (बुधवारी) दुपारी पावणे तीन वाजता होणार आहे.