मुलाला भेटायला तुरुंगात गेला शाहरुख, कशी होती स्थिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 21, 2021

मुलाला भेटायला तुरुंगात गेला शाहरुख, कशी होती स्थिती

https://ift.tt/2Z3Yhlw
मुंबई- ड्रग्ज प्रकरणात मुलाची जामीन याचिका फेटाळल्यानंतर आर्यन खानला भेटण्यासाठी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला आहे. शाहरुख आपल्या मुलाला भेटण्यासाठी जेलमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. मुलाची विचारपूस करण्यासाठी सकाळी- सकाळी तुरुंगात पोहोचला शाहरुख गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख आपल्या मुलाच्या काळजीत आहे. जवळजवळ २१ दिवसांपासून आपल्या मुलापासून दूर असलेल्या शाहरुखने अखेर आपला संयमाचा बांध तोडला आणि आज तो मुलाला भेटायला तुरुंगात गेला. शाहरुख खान आज गुरुवारी सकाळी मुलगा आर्यनची स्थिती जाणून घेण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. याआधी शाहरुखचे आर्यनशी फोनवर बोलले झाले होते. याशिवाय त्याला दोघं १० मिनिटं व्हिडिओ कॉलवरही बोलली होती. आपल्या मुलाची स्थिती जाणून घेण्यासाठी शाहरुख स्वतः जेलमध्ये पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. २० ऑक्टोबर रोजी ड्रग्ज प्रकरणात सत्र न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान आर्यनला जामीन मिळेल अशी सर्वांची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. तुरुंगाबाहेर प्रचंड गर्दी शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तुरुंगाबाहेर मीडियाची गर्दीही दिसत आहे. अहवालानुसार, तुरुंगातील सूत्रांनी सांगितले की, त्याचा जामीन रद्द झाल्याची बातमी ऐकून खूप अस्वस्थ होता. असे सांगितले जाते की या बातमीने दुःखी होऊन आर्यन बॅरेक्सच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसला होता आणि तो कोणाशीही बोलत नव्हता. आर्यन सामान्य बॅरेकमध्ये राहत आहे आर्यन खानला एनसीबीच्या चौकशीनंतर १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. आर्यनला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. मात्र करोनाच्या नियमांनूसार तिथे त्याला पहिले पाच दिवस अलग ठेवण्यात आले होते. यावेळी क्रूझमधून अटक केलेल्या इतर साथीदारांसह त्याला वेगळे ठेवण्यात आले होते. अलगीकरण संपल्यानंतर आणि कोविड अहवाल आल्यानंतर आर्यन खानसह इतर कैद्यांना सामान्य बॅरेकमध्ये पाठवण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयात जामीन याचिका आर्यनच्या वकिलांनी ड्रग्ज प्रकरणात सत्र न्यायालयाकडून आदेशाची प्रत मिळताच जामीन याचिका फेटाळण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण गुरुवारी सुनावणीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.