पाणबुडी रोखल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यावर भारताचं प्रत्यूत्तर... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 21, 2021

पाणबुडी रोखल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यावर भारताचं प्रत्यूत्तर...

https://ift.tt/3jnd7uK
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : पाकिस्तानच्या नौदलाने भारताची मंगळवारी पाकिस्तानने केला होता. मात्र, हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणबुडीच्या स्थाननिश्चतीचा तपशील उपलब्ध झाल्यानंतर भारतीय हद्दीबाहेर गेली नसल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानच्या सागरी सीमांची हद्द त्यांच्या किनारपट्टीपासून १२ समुद्री मैलांपर्यंत पसरलेली आहे. सागरी कारवायांशी संबंधित तज्ज्ञांनी सांगितले की, पाकिस्तानने दावा केलेल्या काळात भारतीय पाणबुडीचे स्थान कराची बंदरापासून १५० समुद्री मैल दूर होते. हे क्षेत्र पाकिस्तानी सागरी सीमेबाहेर आहे. मात्र, भारतीय नौदलाकडून पाकिस्तानच्या या दाव्याबाबत कोणतेही सप्ष्टीकरण किंवा अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी जाहीर केलेल्या पत्रकात, १६ ऑक्टोबरला पाकिस्तानी नौदलाच्या (पीएन) गस्ती विमानाला भारतीय पाणबुडी त्यांच्या हद्दीत आढळल्याचे समजले. त्यानंतर नौदलाने १६ ऑक्टोबरला भारतीय पाणबुडीला पाकिस्तानी समुद्र हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखले. या घटनेनंतर पाकिस्तानच्या नौदलाकडून देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी सतर्कता बाळगली जात असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. भारतीय पाणबुडी पाकिस्तानच्या ओलांडून आल्याची ही तिसरी घटना असल्याचेही पाक लष्कराने म्हटले आहे.