महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर द्यावे; शिवसेना नेत्याची अपेक्षा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 20, 2021

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर द्यावे; शिवसेना नेत्याची अपेक्षा

https://ift.tt/3lUb8Qi
म. टा. विशेष प्रतिनिधी, 'केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी लागल्या आहेत. धक्कादायक म्हणजे भविष्यात घातल्या जाणाऱ्या धाडी आणि त्यांच्या तारखा भाजपचे नेते आधीच सांगत आहेत. त्यामुळे या तपास यंत्रणा भाजपसाठी काम करत आहेत, असाच याचा अर्थ निघतो. अशावेळी आघाडीच्या सर्वच मंत्र्यांनी आता या तपास यंत्रणांच्या धाडींना प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे', असे मत शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री यांनी व्यक्त केले आहे. भास्कर जाधव यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'आता सर्वच मंत्र्यांनी या दडपशाहीविरोधात बोलण्याची गरज आहे. नांदेडला पोटनिवडणूक असून, त्या ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सन २०१४पूर्वीची भाजपची आंदोलने पाहिली, तर लक्षात येईल की हे सर्वजण डोक्यावर सिलिंडर घेऊन फिरायचे. प्रत्येक वेळी हे लोक 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा', असे म्हणायचे. आता 'कुठे नेऊन ठेवला भारत माझा', असे म्हणण्याची वेळ आली आहे', असा टोला जाधव यांनी लगावला. 'राज्यात कुठलीही घटना घडली तरी प्रवीण दरेकर स्टुडिओमध्ये दिसतात. याचा अर्थ असा होतो की एक तर ते स्टुडिओमध्ये जाऊन बसलेले असतात किंवा मीडियाचे लोक त्यांच्या घरी जाऊन बसलेले असतात. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी प्रतिक्रिया देण्यासाठी प्रवीण दरेकर उपलब्ध असतात', असा चिमटाही त्यांनी काढला.