
नांदेड: 'आमचं तोंड बिंड बंद करायची भाषा बोलूच नका. सरकारच्या दादागिरीला आम्ही शरण जाणार नाही. हा बदलणार नाही आणि आम्ही कुणीच बदलणार नाही. आपण सगळे हिंमतीने उभे राहू. कसली ईडी आणि बिडी घेऊन बसलाय', अशी जोरदार फटकेबाजी करत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला आव्हान दिले. देगलूर येथील लोहिया मैदान याठिकाणी देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी भुजबळ यांची सभा झाली. यावेळी भुजबळ यांनी शेरोशायरीतून विरोधकांवर वार केले. ( ) वाचा: राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना सध्या रंगला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीचे काही नेते व मंत्र्यांची चौकशी सुरू असल्याने हा संघर्ष अधिकच धारदार बनला आहे. त्यातून आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. देगलूरच्या सभेतही भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत भाजपवर हल्ला चढवला. 'हम ना बदलेंगे वक्त की रफ़्तार के साथ , हम जब भी मिलेंगे अंदाज पुराना होगा', असा शेर सुनावत तोंड बिंड बंद करायची गोष्ट तुम्ही बोलूच नका, असा इशारा भुजबळ यांनी भाजप नेत्यांना दिला. वाचा: 'ये वक्त वक्त की बात है और वक्त शब्द ऐसा है वक्त में बदल जाएगा, आज तेरा है, कल मेरा होगा', असे सांगत आपण हिंमतीने उभे राहू. कसली ईडी आणि बिडी घेऊन बसलाय. अरे मोठ्या मोठ्या लोकांना त्रास झालाय तर आपण काय? चांगलं काम करायचं म्हटलं की त्रास हा होतोच, असे भुजबळ म्हणाले. उपमुख्यमंत्री यांनी साखर कारखान्यांबाबत महत्त्वाचा तपशील जाहीर केला आहे. त्यावर बोट ठेवत भुजबळ यांनी किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले. अजित पवारांनी साखर कारखान्यांबाबत सगळी माहिती दिली आहे. तेव्हा तुमच्या लोकांनी कुठे कुठे साखर कारखाने घेतले त्याची आता चौकशी करून दाखवाच, असे आव्हान भुजबळ यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील घोटाळ्यांची यादी यावेळी भुजबळ यांनी वाचून दाखवली व हे घोटाळे बाहेर काढा ना, असे आव्हानही दिले. काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या विधानाचाही भुजबळ यांनी समाचार घेतला. भाजपमध्ये गेल्यावर हर्षवर्धन यांना सुखाची झोप लागते आहे. म्हणजे कितीही भानगडी करा तुम्ही भाजपमध्ये असाल तर काहीही होणार नाही, असा सरळसरळ अर्थ निघतो, असा निशाणा भुजबळ यांनी साधला. महाराष्ट्र सदनवरून टोलेबाजी मला यांनी जेलमध्ये टाकलं. का तर महाराष्ट्र सदन बांधलं म्हणून. त्या कॉन्ट्रॅक्टरला अद्याप एक रुपयाही देण्यात आला नाही. एकूण काम दिलं शंभर कोटींचं आणि माझ्यावर आरोप केला ४० हजार कोटींचं काम दिलं म्हणून. नंतर हा आकडा कमी करत गेले. म्हणाले साडेआठशे कोटींचा घोटाळा झाला. अरे शंभर कोटींचं कॉन्ट्रॅक्ट आणि मला कुणी साडेआठशे कोटी देईल का?, असा सवाल भुजबळ यांनी केला. भुजबळ यांनी यावेळी किस्साही ऐकवला. पाच फुटांची म्हस. ती गाभण झाली आणि मग बाळंत झाली तर तिला १५ फुटाचं रेडकू होईल का?, असा सवाल भुजबळ यांनी केला आणि सभेत एकच हशा पिकला. वाचा: