हिंदू सण असले की हे आठवतं का? त्या ट्विटमुळे रितेश देशमुख झाला ट्रोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 24, 2021

हिंदू सण असले की हे आठवतं का? त्या ट्विटमुळे रितेश देशमुख झाला ट्रोल

https://ift.tt/3pAWL5x
मुंबई : बॉलिवूडमधील हा लोकप्रिय अभिनेता आहे. हिंदी-मराठी सिनेमांबरोबरच रितेश आणि त्याची बायको जेनेलिया डिसोजा सोशल मीडियावर खूपच सक्रीय असतात. रितेश त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अनेक व्हिडिओ, फोटो शेअर करत असतो. त्याच्या या व्हिडिओ, फोटोंवर त्याचे चाहते कायम भरभरून कॉमेन्ट करत असतात. अलिकडेच रितेशने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे त्याला खूप ट्रोल केले जात आहे. काय होती रितेशची पोस्ट सोशल मीडियावर रितेश अनेकदा मजेशीर व्हिडिओ, पोस्ट शेअर करत असतो. अलिकडेच त्याने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात रितेशने मिठाई खाल्यामुळे किती कॅलरीज शरीरात जातात आणि त्या मिठाईचे दिवसागणिक वाढत जाणा-या किंमती याकडे लक्ष वेधले होते. लाडू, जिलबी, काजू बर्फी आणि चॉकलेटचे भाव सांगितले आहेत. या लिस्टच्या शेवटी वजन कमी करण्यासाठी लागणारे पैसे. ही पोस्ट शेअर करत 'डोकं लावून निवडा, मला वाटलं म्हणून मी तुम्हाला इशारा दिला आहे...', असे रितेशने नमूद केले आहे. मात्र, रितेशच्या या पोस्टवरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात झाली आहे. एका युझरने लिहिले की,'तुम्ही सनातनी फक्त सण असतात तेव्हाच का ज्ञान देता? ईद किंवा ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही तोंडात दही घेऊन गप्प का बसता', असे लिहिले. युझरच्या या कॉमेन्टवर रितेशनेही सडेतोड उत्तर दिले आहे. युझरने केलेल्या या कॉमेन्टवर रितेशने देखील मजेशीर उत्तर लिहिले आहे की,'सॉरी सर, मी विगन आहे, मी दही खात नाही...' रितेशचे हे उत्तर अनेक युझर्सना आवडले असून त्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.