ठाण्यात ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई; १४० आरोपींना बेड्या, फक्त ४ तासांत... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 24, 2021

ठाण्यात ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई; १४० आरोपींना बेड्या, फक्त ४ तासांत...

https://ift.tt/2Zi7Tcj
ठाणे: आयुक्तालयाच्या हद्दीतील अंमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री विशेष मोहिम राबवत विक्री, अंमली पदार्थ सेवन करणारे गर्दुल्ले आणि मद्यपींवर कडक कारवाई केली. चार तासांच्या विशेष मोहिमेत पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकांनी शहरातील बस स्टॉप, पडक्या इमारती, घरे, बंद वाहने, गर्दुल्ले बसण्याची ठिकाणे, निर्जन स्थळे, गुन्हेगारी वस्त्या, झोपडपट्ट्या, संवेदनशील ठिकाणे, अंमली पदार्थ विक्रीची ठिकाणे आणि सार्वजनिक स्वच्छता गृहांच्या बाजूचा परिसर अशा ठिकाणी तपासणी केली. एकाचवेळी झालेल्या या कारवाईमध्ये अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात तब्बल ९३ गुन्हे दाखल झाले असून १४० जणांना अटक करण्यात आली आहे. ( ) वाचा: परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये अंमली पदार्थांचा विळख वाढत असून त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याचे समोर आले आहे. ठाणे शहरातील आणि दाट लोकवस्तीच्या झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या ठिकाणी अंमली पदार्थांचे केंद्र निर्माण होऊ लागले आहे. यातून महिला अत्याचाराच्या घटना आणि गंभीर गुन्ह्यांची शक्यता निर्माण होत असल्याने पोलीसांकडून व्यापक मोहीम राबवण्याचे निश्चित करण्यात आले होते. वाचा: पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी, गुन्हे शाखेचे सर्व घटक प्रभारी अधिकारी यांच्या माध्यमातून ही विशेष मोहिम राबवण्यात आली. यामध्ये ११८ पोलीस अधिकारी, ३३१ पोलीस अमलदार व इतर कुमक वापरण्यात आली. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या भागात ही मोहीम राबवण्यात आले. अंमली पदार्थ खरेदी विक्री करणारे, अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून असे ९८ गुन्हे दाखल करून १४० आरोपींनी अटक करण्यात आले. दारूबंदी कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल झाले असून १८ आरोपींनी अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या माध्यमातून भिवंडी, उल्हासनगर, विठ्ठलवाडी येथे गुंगीच्या पदार्थांची नशा करणाऱ्यांवर कारवाई करत आरोपींनी अटक करण्यात आले. वाचा: