सेंट्रल, हार्बरसह पश्चिम रेल्वे मार्गावरही उद्या मेगाब्लॉक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 23, 2021

सेंट्रल, हार्बरसह पश्चिम रेल्वे मार्गावरही उद्या मेगाब्लॉक

https://ift.tt/3b0NBHd
म. टा. प्रतिनिधी, ठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेने रविवारी, उद्या मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी तिन्ही मार्गांवर ब्लॉक असल्याने पर्यायी मार्गावर विलंबाने लोकल धावणार आहेत. मध्य रेल्वे (मुख्य मार्ग) स्थानक - ठाणे ते कल्याण मार्ग - अप आणि डाऊन धीमा वेळ - सकाळी ११ ते दुपारी ४ परिणाम - ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकलफेऱ्या विलंबाने धावणार आहेत. हार्बर रेल्वे स्थानक - पनवेल-वाशी मार्ग - अप आणि डाऊन वेळ - सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ परिणाम -पनवेल येथून सीएसएमटी दिशेला सुटणाऱ्या आणि सीएसएमटीहून बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. पनवेल-ठाणे दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन आणि नेरुळ-खारकोपर दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी या लोकलफेऱ्या सुरू राहतील. पश्चिम रेल्वे स्थानक - सांताक्रुझ ते गोरेगाव मार्ग - अप आणि डाऊन जलद वेळ - सकाळी १० ते दुपारी ३ परिणाम - ब्लॉक वेळेतील जलद लोकलफेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकलफेऱ्या रद्द होतील. तर काही लोकल विलंबाने धावणार आहेत.