सोनिया गांधींची वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक, संसदेत सरकारला घेरण्याची रणनीती तयार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 26, 2021

सोनिया गांधींची वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक, संसदेत सरकारला घेरण्याची रणनीती तयार

https://ift.tt/311oOBk
नवी दिल्लीः २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली. संसदेत सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने रणनीती तयार केली आहे. एमएसपीला कायदेशीर हमीसह शेतकरी संघटनांच्या मागण्या, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी, महागाई, सीमेवर चीनची आक्रमकता आणि पेगासस हेरगिरी प्रकरणासारखे मुद्दे संसदेत काँग्रेस उपस्थित करण्यात येणार आहे. या मुद्द्द्यांवरून काँग्रेस सरकारला घेरणार आहे. सरकार कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक मांडणार वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक हे संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडण्यावर बैठकीत भर देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. केंद्रीय वादग्रस्त तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या चर्चेत भाग घेतला जाईल आणि विधेयकाला पाठिंबा देण्याबाबतही बैठकीत निश्चित करण्यात आलं. शेतकरी संघटनांच्या मागण्या सरकारने स्वीकार कराव्यात यावर बैठकीत जोर देण्यात आला, असे बैठकीत उपस्थित असलेल्या एका काँग्रेस नेत्याने सांगितले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, आनंद शर्मा, जयराम रमेश, लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी, के. सुरेश यांच्यासह इतर काही नेते बैठकीत उपस्थित होते. मनीष तिवारी अनुपस्थित काँग्रेसच्या या रणनीती समूहाचे सदस्य आणि खासदार मनीष तिवारी हे या बैठकीला अनुपस्थित होते. तिवाही हे पंजाबमध्ये असल्याने ते बैठकीला येऊ शकले नाहीत. तिवारी यांनी आपल्या नव्या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. तिवारी यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यावरून तत्कालीन यूपीए सरकारवर टीका केली आहे.