श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; चकमकीत दोन दहशतवादी ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 16, 2021

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; चकमकीत दोन दहशतवादी ठार

https://ift.tt/30w04AU
श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये हैदरपुरा भागात सुरक्षादलांना मोठं यश मिळालं. सुरक्षा दलांच्या जवानांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजता ही चकमक सुरू झाली होती. या चकमकीनंतरही सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. चकमक सुरू होताच काही वेळात पहिला दहशतवादी मारलला गेला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुसरा दहशतवादीही ठार झाला. चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्यानंतरही सुरक्षा दलांची कारवाई सुरूच आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. या वर्षी सुरक्षा दलाच्या जवानांनी आतापर्यंत १३० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. काश्मीरच्या खोऱ्यात अजूनही ३८ विदेशी दहशतवादी आहेत. एकूण १५० ते २०० दहशतवादी सक्रिय असल्याचं सांगण्यात येतंय. जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडच्या काळात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. ८ नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी एका गोळ्या घालून एका सेल्समनची हत्या केली होती. त्यापूर्वी ७ नोव्हेंबरला एका पोलीस कॉन्स्टेबलची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात दहशतवाद्यांनी १३ नागरिकांची हत्या केली होती.