जिल्हा बँक निवडणुकीत कॉग्रेसचा अभिमन्यू केला; जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारांचा राष्ट्रवादीवर आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 12, 2021

जिल्हा बँक निवडणुकीत कॉग्रेसचा अभिमन्यू केला; जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारांचा राष्ट्रवादीवर आरोप

https://ift.tt/3D4kfE2
म. टा. प्रतिनिधी, जळगाव जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये चोपड्याची जागा कॉग्रेसच्या वाट्याला आली होती. मात्र, ऐनवेळी चिन्ह वाटपात बंडखोर उमेदवार घनश्याम अग्रवाल यांना महाविकास आघाडीचे चिन्ह देण्यात येवून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मविआचे अधिकृत उमेदवार असलेल्या डॉ. सुरेश पाटील यांना डावलून अभिमन्यू केल्याचा आरोप कॉग्रेसचे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला आहे. ( district president pradip pawar makes allegations against ) गुरुवारी कॉग्रेस भवन येथे कॉग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी आमदार शिरीष चौधरी, डॉ. सुरेश पाटील, जमील शेख, शैलजा निकम यांच्यासह कॉग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा- चोपड्याचा जागेबाबत आम्ही, विद्यमान संचालक सुरेश पाटील यांच्यासाठी आग्रही होतो. मात्र, ज्या प्रकारे कॉग्रेसची दिशाभूल करण्यात आली. याबाबत आमचे सर्वच पदाधिकारी नाराज असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी आघाडी धर्म पाडला. मात्र, राष्ट्रवादीने चोपड्याचा जागेबाबत आमची दिशाभूल केल्याचेही पवार यांनी सांगितले. कॉग्रेसला मिळालेल्या यावल व महिला राखीवमधील दोन्ही जागा जिंकण्याचा प्रयत्न कॉग्रेसचा राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- यासह शैलजा निकम व विनोद पाटील हे कॉग्रेसचे अधिकृत सदस्य आहेत. त्यांना कॉग्रेसने उमेदवारी दिल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. डी. जी. पाटील यांनी कॉग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसेंनी ठरविल्याच्या आरोपाचेही पवार यांनी खंडन केले. क्लिक करा आणि वाचा-