''त्या' बेलगाम सांडला बांधून ठेवा', ओवेसींवर टीका करताना टिकैत यांनी पातळी सोडली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 26, 2021

''त्या' बेलगाम सांडला बांधून ठेवा', ओवेसींवर टीका करताना टिकैत यांनी पातळी सोडली

https://ift.tt/3DWCagy
हैदराबादः भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते यांनी AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्ती निमित्ताने हैदराबाद येथील धरणा चौकात आयोजित 'महा धरणा' संबोधित केले. यावेळी त्यांनी असदुद्दीन ओवेसींची तुलना ‘बेलगाम सांड’ अशी केली. राकेश टिकैत यांनी नाव न घेता ओवेसींवर निशाणा साधला. हा बेलगाम सांड देशभर भाजपला मदत करतो. त्याला हैदराबाद आणि तेलंगणमध्येच बांधून ठेवा, असे टिकैत म्हणाले. वेसण नसलेला बेलगाम सांड भाजपला मदत करत फिरत आहे. तुम्ही त्याला इथे बांधून ठेवा. भाजपला तो देशात सर्वाधिक मदत करतो. त्याला येथून जाऊ देऊ नका. तो बोलतो वेगळंच, त्याचा हेतू काही वेगळाच असतो. हे तपासून पाहा. त्या इथेच बांधून ठेवा. त्याला हैदराबादमधून बाहेर पडू देऊ नका, असे राकेश टिकैत पुढे म्हणाले. हा सांड जाईल तिथे भाजपला मदत करेल. हे संपूर्ण देशाला माहीत आहे. त्याला बांधून ठेवा. बेलगाम सांडे आहे. तो ज्ञान वेगळं काही देतो आणि तोडून मोडून काम करतो. ते दोन्ही A आणि B टीम आहेत. देशातील जनतेला हे सर्व माहिती आहे, असे बोलले. आता मुस्लिमही CAA विरोधात आंदोलन करणार दुसरीकडे, असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या एका गावात जाहीरसभा घेतली. यावेळी ओवेसींनी पंतप्रधान मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. तसंच सीएए आणि एनआरसीवरूनही केंद्राला लक्ष्य केलं. धर्माच्या आधारावर सीएए आणला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करून तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यास शेतकऱ्यांना भाग पाडले. अशाच प्रकारे मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून सीएएविरोधात आंदोलन करावं. कुठल्याही स्थितीत सीएए आणि एनआरसी लागू होऊ देणार नाही, असे ओवेसी म्हणाले.