Omicron ला मात देण्यासाठी नव्या लशीची निर्मिती, 'या' कंपनीनं घेतला पुढाकार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 30, 2021

Omicron ला मात देण्यासाठी नव्या लशीची निर्मिती, 'या' कंपनीनं घेतला पुढाकार

https://ift.tt/3pfOBhh
नवी दिल्ली : करोना विषाणूचा संसर्ग लसीकरणामुळे आटोक्यात आल्याचे दिसत असतानाच आता दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन या विषाणूमुळे सर्वत्र धास्ती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनला निष्प्रभ करू शकेल, अशा लशीची निर्मिती करण्याची तयारी आता सुरू झाली आहे. जर्मनीच्या '' या औषधनिर्माण कंपनीने सोमवारी ही माहिती दिली. ही कंपनी फायझरच्या मदतीने ओमायक्रॉनवरील लस संशोधित करण्याच्या कामी लागली आहे. करोना विषाणूच्या संसर्गानंतर ठरावीक अंतराने या विषाणूचे नवे प्रकार आढळत आहेत. या नवनव्या प्रकारांना तोंड देण्यासाठी आमची कंपनी निरंतर संशोधन करत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनबाबतही आम्ही संशोधन सुरू केले आहे, असे या कंपनीतर्फे सांगण्यात आले. सध्या उपलब्ध असणारी करोनाप्रतिबंधक लस ओमायक्रॉनवरही प्रभावी आहे का, याची प्रथम चाचणी केली जाईल. यासाठी पुढील दोन आठवडे आम्हाला अधिकाधिक प्रयोगशाळा नमुने तपासावे लागतील, असेही या कंपनीने म्हटले आहे. १०० दिवसांत येणार? ओमायक्रॉन हा अतिशय घातक प्रकार असून त्याचा संसर्ग झपाट्याने होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर या कंपनीची ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. करोना संसर्गाचा एखादा नवा प्रकार आढळल्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असणारी लस आम्ही १०० दिवसांत उत्पादित करू शकू, असे या कंपनीने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यामुळे ओमायक्रॉनला तोंड देण्यासाठी गरज पडल्यास आम्ही १०० दिवसांत नवी लस दाखल करू, असे फायझरने स्पष्ट केले. अन्य कंपन्यादेखील सक्रिय बायोएनटेकव्यतिरिक्त '' आणि '' या कंपन्यादेखील ओमायक्रॉन प्रतिबंधक लशीच्या संशोधनासाठी सक्रिय झाल्या आहेत. नव्या लशीसंबंधीच्या संशोधनाव्यतिरिक्त सध्या अस्तित्वात असलेल्या आमच्या करोनाप्रतिबंधक लशीच्या स्वरूपात काही बदल करून ओमायक्रॉनवर मात करता येईल का, याचीही आम्ही चाचपणी करत आहोत, असे मॉडर्नाने म्हटले आहे.