नवी दिल्लीः नागालँडमध्ये अतिरेकीसमजून सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू ( ) झाला. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला. या घटनेची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली आहे. त्यांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा ( ) आजपासून सुरू होतोय. अधिवेशनात हा मुद्दा तापण्यासाठी चिन्ह आहेत. शिवसेनेचे खासदार ( ) यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर आणि सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. अधिवेशनासाठी राऊत हे दिल्लीत आहेत. त्यांनी काहीवेळापूर्वीच पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणी विरोधी पक्षांनी माफी मागावी, असे सरकारचे म्हणणे आहे. पण खासदारांचा गुन्हा काय. मागच्या अधिवेशनाची शिक्षा या अधिवेशनात का? तसेच माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे राऊत म्हणाले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची थोड्याच वेळात बैठक होत आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हे बैठक घेत आहेत, असे राऊत यांनी सांगितले. नागालँडमध्ये दहशतवादी समजून कोळसा खाणी काम करणाऱ्या मजुरांवर गोळीबार करण्यात आला. या घटनेवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला बोल केला. नागरिकांना दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जात आहे. पण विरोधात बोललो की आम्हाला देशद्रोही ठरवलं जात आहे. सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ केला जातोय. फरक एवढाच आहे की आम्हाला गोळ्या घातल्या जात नाही, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. नाशिकमध्ये साहित्य संमेलनात लोकसत्ता दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. या घटनेचा संजय राऊत यांनी निषेध केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल किंवा महापुरुषांविषयी लिखाण करताना काळजी घ्यायला हवी. आपण भान बाळगलं पाहिजे. पण कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, असं राऊत म्हणाले. भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावं, असा पुनरुच्चारही संजय राऊत यांनी केला.