'त्या' रिक्षाचालकांचे सर्वत्र होतेय कौतुक; कुराण आणि हनुमान चालिसाचे केले एकत्र पठण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 11, 2022

'त्या' रिक्षाचालकांचे सर्वत्र होतेय कौतुक; कुराण आणि हनुमान चालिसाचे केले एकत्र पठण

https://ift.tt/fXeCnzm
पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे () अध्यक्ष (Raj Thackeray) यांच्या 'हिंदूंनी मंदिरांवर भोंगे लावावे व हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करावे' या आवाहनानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक वातावरण ढवळून निघाले असताना दुसरीकडे पिंपरी चिंचवड मधील रिक्षाचालकांच्या एका कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. याचे कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये हिंदू व मुस्लिम धर्मीय रिक्षा चालकांनी एकत्र येत व हनुमान चालिसाचे एकाच कार्यक्रमात पठण केले. या द्वारे या रिक्षा चालकांनी हिंदू-मुस्लिम एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला. ( recite and together in Pimpri Chinchwad) क्लिक करा आणि वाचा- आज देशभरात पवित्र रमजान आणि राम नवमी मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात भाषण केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पडायला सुरुवात झाली. मात्र, असे असताना पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालकांनी धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी कुराण आणि हनुमान चालिसाचे पठण करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला. क्लिक करा आणि वाचा- सध्या मुस्लिम धर्मीयांचा रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. तर, रविवारी राम नवमीचा दिवस होता. दोन्ही धर्मांतील सणाचं पावित्र्य आणि आदर राखत काल रविवारी हिंदू व मुस्लिम बांधवांनी हनुमान चालीसा आणि कुराण मधील सुराह अल फतेह या आयतींचे एकत्र पठण केले. आणि मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यांवरून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये या दृष्टीने रिक्षाचालकांनी केलेल्या या कृतीचं सर्वत्र कौतुक केले जात आहे. क्लिक करा आणि वाचा-