खासदार उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 8, 2022

खासदार उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

https://ift.tt/KguGwJE
सातारा: किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर राष्ट्रवादीचे (MLA Makrand Patil) यांनी (MP Udayanraje Bhosale) यांची जलमंदीर या उदयनराजेंच्या निवास स्थानी भेट घेतली. या भेटीनंतर जिल्ह्यात चर्चांना उधान आल्याचे पहायला मिळत आहे. कारखान्याच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मकरंद पाटील यांनी उदयनराजे भोसले यांची जलमंदीर या ठिकाणी जाऊन कशी काय भेट घेतली, या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (ncp mla makrand patil meets bjp mp udayanraje bhosale) किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मकरंद पाटील यांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठी मदत केल्याचे बोलले जात आहे. यामुळेच मकरंद पाटील हे अचानक जलमंदीर या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी उदयनराजे यांचे आभार मानले आहेत, अशी चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. या‌ भेटीदरम्यान नक्की काय चर्चा झाली या बाबत मात्र गूढ कायम‌ आहे. क्लिक करा आणि वाचा- खासदार उदयनराजे यांनी भेट झाल्यानंतर मकरंद पाटील यांना पेढा भरवत त्यांना विजयी झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर दोघांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. परंतु आमदार मकरंद पाटील हे प्रथमच जलमंदीर या ठिकाणी गेल्याचे पहायला मिळाले आहे. यामुळेच आता साताऱ्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. क्लिक करा आणि वाचा- ८ मे रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे ही साताऱ्यात आहेत. या दिवसाच्या पूर्वसंध्येला दोघांची झालेली भेट महत्वाची मानली जात आहे. साताऱ्याच्या दौऱ्यात शरद पवार आणि अजित पवार नक्की काय बोलणार आणि काय निर्णय घेतले जाणार याबाबत जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागून राहिल‌े आहे. क्लिक करा आणि वाचा-