राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची मुजोरी, महिला अधिकाऱ्याच्या अंगावर गेले धावून - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 3, 2022

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची मुजोरी, महिला अधिकाऱ्याच्या अंगावर गेले धावून

https://ift.tt/Df3otwY
: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक यांनी अन्न पुरवठा विभागातील महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची आणि अंगावर धाऊन गेल्याची घटना आज घडली आहे. ही घटना सीसीटिव्ही मधे कैद झाली असून या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. तर या धक्कादायक प्रकारच्या विरोधात अन्न व नागरी पुरवठा कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे. (a former ncp corporator in insulted a ) आज दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास जिल्हा परिषद येथील अन्न व नागरी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या पुरवठा निरीक्षक शिल्पा बगाडे या कार्यालयात काम करत असताना माजी नगरसेवक सुभाष जगताप हे तिथं आले आणि त्यांनी थेट बगाडे यांना शिवीगाळ केली आणि अंगावर देखील जाण्याचा प्रयत्न केला. पण तिथं असलेल्या एका कर्मचाऱ्याने जगताप यांना थांबवले. क्लिक करा आणि वाचा- हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. हा जो प्रकार आज अन्न व नागरी पुरवठा कार्यालयात घडला आहे त्या प्रकरणी येथील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-