राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावाच लागेल : प्रकाश आंबेडकर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 3, 2022

राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावाच लागेल : प्रकाश आंबेडकर

https://ift.tt/xOBFnEd
अकोला : राज्यसभा निवडणुकीच्या () पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर () यांनी राज्यसभेची खरी लढाई भाजप () आणि राष्ट्रवादी काँग्रेस () अशी असल्याचं म्हटलंय. या निवडणुकीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी खिळखिळी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं आंबेडकर म्हणाले. धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीमुळं प्रत्यक्षात भाजप-शिवसेनेतील ही लढत राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी झाली असल्याचंही ते म्हणाले. आपली ताकद कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावाच लागेल असंही आंबेडकर म्हणालेत. भाजपचे उमेदवार पूर्वीचे राष्ट्रवादीचे खासदार महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सहावा उमदेवार शिवसेनेचा पण आहे आणि भाजपचा देखील आहे. भाजपचे सहावे उमेदवार हे राष्ट्रवादीचे यापूर्वीचे खासदार होते. साखर कारखानदारी आणि सहकाराचा त्यांना अभ्यास आहे. भाजपनं राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील गडाला भगदाड पाडण्याचा यानिमित्तानं प्रयत्न चालवला आहे. त्यामुळं ही निवडणूक ही भाजप विरुद्ध शिवसेना असली तरी ती प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी झालीय. राष्ट्रवादीला संजय पवारांना निवडून आणावं लागेल राष्ट्रवादीला स्वत: चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल. तो उमेदवार निवडून न आल्यास भाजपनं राष्ट्रवादीच्या गडात प्रवेश केला असं म्हटलं जाईल. राष्ट्रवादीला पूर्णपणे भाजपला आव्हान देणं सोपं जाईल. केंद्राच्या हातात इथेनॉलचं लायसन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचं लालूच दाखवून ते त्यांना भाजपकडे घेतील आणि राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते. राज्यसभा निवडणुकीत आतापर्यंतचा सर्वात मोठा घोडेबाजार राज्यसभा निवडणुकीत आतापर्यंतचा सर्वात मोठा घोडेबाजार होणार असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी यावेळी केला. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार आहे. आपल्या ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल. महाराष्ट्राची जनता हे पाहतेय, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीची उर्वरित मतं शिवसेना उमेदवाराला देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे.