म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई वडाळ्यामध्ये करण्याची संशयातून दोन मुलांनी आणि त्यांच्या मैत्रिणीने मिळून आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्हा उघडकीस आणून महिलेचा मुलगा आणि तिच्या मैत्रिणाला अटक केली. (two boys with help of their friends murdered a woman on suspicion of ) वडाळ्याच्या पंचशील नगरमध्ये निर्मला ठाकूर या पती आणि दोन मुलांसह वास्तव्यास होत्या. शनिवारी पहाटे निर्मला यांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. पतीच्या तक्रारीवरून वडाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. चौकशदरम्यान निर्मला हा करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या अनुषंगाने अधिक तपास केला त्यावेळी घरच्याच व्यक्तींचा हत्येमध्ये सहभाग असल्याचे प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना जाणवले. पोलिसांनी निर्मला यांचा मुलगा अक्षय याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता अक्षय याने हत्येची कबुली दिली. क्लिक करा आणि वाचा- निर्मला ठाकूर या काळी जादू करून घरातील व्यक्तींना वश करून ठेवतात असा त्यांच्या दोन्ही मुलांचा समज होता. त्यातच अक्षय आणि त्याची मैत्रीण कोमल यांच्यामध्ये प्रेम होते. या प्रेमविवाहास निर्मला यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी दोन्ही मुले आणि कोमल हिच्यावर करणी केली असल्याचे सर्वांना वाटत होते. आईचा अडसर दूर करण्यासाठी तिघांनी मिळून तिची हत्या केली. पोलिसांनी अक्षय आणि कोमल या दोघांना अटक केली आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-